Ad will apear here
Next
सेंद्रिय शेतीशी संबंधित ‘मेरा किसान’मध्ये अजिंक्य रहाणे यांची गुंतवणूक


शेती व शेतकऱ्यांबद्दल आस्था बाळगणारे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी ‘मेरा किसान’ या सेंद्रिय शेती पुरवठा साखळीतील अव्वल कंपनीत गुंतवणूक केली आहे. अजिंक्य हे ‘मेरा किसान’चे ब्रँड अॅम्बेसेडरही असतील. ‘मेरा किसान’चे मुख्यालय पुण्यात आहे.

‘‘मेरा किसान’चे सेंद्रिय शेतीचे बिझनेस मॉडेल शाश्वत स्वरूपाचे असून, या प्रक्रियेत सहभागी होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे,’ असे अजिंक्य यांनी म्हटले आहे.

‘मेरा किसान’विषयी...
मेरा किसान’ ही अल्पावधीत साकारलेली अद्वितीय यशकथा होय. ‘मेरा किसान प्रा. लि.’चे संस्थापक प्रशांत पाटील यांचा गुलबर्गा ते पुणे व्हाया सिडनी हा दोन दशकांतील प्रवास प्रेरक आहे. एका टेक्नोक्रॅट व्यक्तीने स्वत:बरोबरच असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनातही परिवर्तन घडवून आणले आहे.

प्रशांत पाटीलगुलबर्गा येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत पाटील यांनी ऑस्ट्रेलियात १४ वर्षे आयटी सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यानंतर मायदेशात परतून शेती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१४मध्ये त्यांनी भारतात ‘मेरा किसान’ची कंपनीची स्थापना केली. शेतमालाची ऑनलाइन मंडई असे ‘मेरा किसान’चे वर्णन करता येईल. देशातील विविध प्रकारच्या सर्टिफाइड सेंद्रिय मालाची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून, बिग-बझारसारखे मॉल्स वा कंपन्यांना विक्री केली जाते. 
‘मेरा किसान’शी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांना १५ ते ३२ टक्क्यापर्यंत अधिक परतावा मिळाला आहे, तर ग्राहकांच्या खर्चातही १४ टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे पाटील सांगतात.

शेतमाल उत्पादनापासून ते विक्रीच्या सर्व टप्प्यांवर सेंद्रिय मालाची गुणवत्ता राखण्यासाठी ‘ट्रेसॅबिलिटी सिस्टीम’ कार्यरत आहे. यात गुणवत्ता नियंत्रण आणि पडताळणी केली जाते. अलीकडेच, ऑरगॅनिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कार्यान्वित करण्यात आला आहे. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद येथे कंपनीची रिटेल विक्री केंद्रे आहेत.

‘इंडियन कौन्सिल फॉर फूड अँड अॅग्रिकल्चर’ने पुण्यातील ‘मेरा किसान प्रा. लि’ला सेंद्रिय शेतीतील बेस्ट स्टार्टअप हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिला.

‘मेरा किसान’ने ‘ऑरगॅनिक पंडित’ या नावाने एक सेंट्रल हबही कार्यान्वित केले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारलेले हे सेंट्रल हब सेंद्रिय उत्पादनांचे ऑनलाइन रेकॉर्ड ठेवणार आहे. त्यात सेंद्रिय उत्पादनांचा थेट शेतातून ग्राहकापर्यंतचा प्रवास ‘ट्रेस’ होईल. याद्वारे सेंद्रिय भाजीपाला खरोखर सेंद्रिय आहे का, हे ओळखणे सोपे जाईल.

- दीपक चव्हाण
(लेखक कृषी विपणन आणि शेतीमाल बाजार क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTWCK
Similar Posts
होंडातर्फे पहिली ‘बीएस-सिक्स’ मोटारसायकल दाखल नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने वायू उत्सर्जनाबाबतच्या भारत-सहा (बीएस-सिक्स)निकषांची पूर्तता करणारी पहिली अत्याधुनिक १२५ सीसी क्षमतेची मोटरसायकल ‘एसपी१२५ बीएस-सिक्स’ दाखल केली आहे.
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे
पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरण शेट्टी पुणे : पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी २०१९-२०२० या वर्षासाठी शरण शेट्टी यांची निवड झाली आहे. हॉटेल वेस्टिन येथे झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेट्टी यांची निवड करण्यात आली.
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language